शिवसेनेचे खासदार संजय राऊत आता किरीट सोमय्या यांचा शंभर कोटीचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज महाविकास आघाडीचा नवा घोटाळा बाहेर काढण्यासंदर्भातील इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधलाय. राऊत यांनी आपण लवकरच सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून यामध्ये १०० कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा आरोप केलाय.
आता मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा झालाय. म्हणजे कुठे कुठे पैसे खातात पाहा, विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत” असं म्हमत राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर निशाणा साधलाय. “हे किरीट सोमय्याच आहेत. यासंदर्भातील सगळी कागदपत्र सुपूर्द झालेली आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही संस्था चालवत होते हे आणि यांचं कुटुंब त्यांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा झाला आहे,” असा आरोप राऊत यांनी केलाय.
www.konkantoday.com