चिपळुणात दरवाढीविरोधात युवासेनेचे थाळीनाद आंदोलन
चिपळूण : डिझेल, पेट्रोल व घरगुती गॅसची झालेली दरवाढ यावरून आक्रमक होत केंद्र शासनाचा निषेध चिपळुणात करण्यात आला. चिपळुणातील युवा सेनेने रविवारी चिपळूण शहरातील शिवाजी महाराज चौकात थाळीनाद आंदोलन केले. तालुका युवा अधिकारी उमेश खताते, उमेश सकपाळ, बाळा कदम, संतोष सुर्वे, युवा सेना शहरप्रमुख निहार कोवळे, महिला आघाडी शहरप्रमुख वैशाली शिंदे, पुष्कर चव्हाण आदी पदाधिकार्यांसह इतरही कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. दरवाढ कमी करा, इंधनवाढ कमी करा, केंद्र शासनाचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.