
देवरूख आगारातील गाड्या निवडणुकीला लागल्याने ३६ फेर्या उद्यापर्यंत बंद
लोकसभा निवडणूक असल्याने देवरूख आगारातून तब्बल ३६ फेर्या ८ रोजी पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेवून सहकार्य करण्याचे आवाहन देवरूख आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांनी केले आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष ७ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या यंत्रणेत एस.टी. बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक मार्गावरील बसफेरर्या, लांब पल्ल्याच्या फेर्या, वस्तीच्या बसफेर्या ८ रोजीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com