सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयावर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

भाजपसह विविध स्तरांतून होणाऱ्या विरोधाला न जुमानता राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयावर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.त्यानुसार सुरुवातीस सुमारे ६०० ठिकाणी वाइन विक्रीला उपलब्ध होईल असे सांगण्यात आले. राज्यात सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाने घेतला होता
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button