राज्याच्या मागणीनुसार केंद्राने पर्यटन विकसित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतला -मंत्री उदय सामंत
राज्याच्या मागणीनुसार केंद्राने पर्यटन विकसित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.राज्याने केंद्राकडे पाच जिल्ह्यांबाबत मागणी केली होती. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन विकसीत करण्यासाठी केंद्राने दत्तक जिल्हा घोषीत केला आहे. त्याचबरोबर यवतमाळ हा जिल्हा शिक्षणासाठी घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा या पूर्वीच पर्यटन जिल्हा जाहीर झाला आहे. पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी निश्चितच चांगल्या पायाभूत सुविधा केल्या जातील.
www.konkantoday.com