मुंबई विद्यापीठाच्या 54 व्या आंतर महाविद्यालय युवा महोत्सवामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये एकूण 14 स्पर्धांमध्ये 9 स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून 19 पॉईंटसह रत्नागिरी जिल्ह्याच्या झोन दहामध्ये निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. शास्त्रीय गीतगायन
प्रथम क्रमांक – वैष्णवी जोशी
सुगम गीतगायन
प्रथम क्रमांक- वैष्णवी जोशी
वेस्टर्न गीतगायन
प्रथम क्रमांक- ईशान पालेकर
शास्त्रीय नृत्य
तृतीय क्रमांक- आर्या केळकर
वक्तृत्व स्पर्धा
तृतीय क्रमांक- पर्णिका तिवरेकर
एकपात्री स्पर्धा
द्वितीय क्रमांक- शुभम शिवलकर
मिमिक्री
द्वितीय क्रमांक- तेजस कांबळे
पोस्टर मेकिंग
प्रथम क्रमांक- हर्ष कांबळे
कार्टूनिंग
तृतीय क्रमांक- अमिषा सुवरे
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम स्पर्धेसाठी वरील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. तांत्रिक बाजू सांभाळणारे प्रा.शुभम पांचाळ ,कौस्तुभ आंब्रे, बुशरा खान, सिद्धी गुरव,गायत्री भुवड यांचे विशेष सहकार्य होते संगीत विभागासाठी ओंकार बंडबे, प्रा.हरेश केळकर, चैतन्य पटवर्धन यांचे मार्गदर्शन मिळाले , वाङमय विभागामध्ये प्रा.जयंत अभ्यंकर, नाट्य विभागासाठी नंदकिशोर जुवेकर,शैलेश इंगळे हस्तकला विभागासाठी प्रा. शुभम पांचाळ, ओमकार कांबळे ,नृत्य विभागासाठी धनश्री नागवेकर -मुरकर यांनी मार्गदर्शन केले.संपूर्ण विद्यार्थ्यांच्या निवडीचे काम सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी पाहिले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन ,कार्यवाह सतीश शेवडे, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे या सर्वांनी सदर यशाबद्दल अभिनंदन आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.