
रत्नागिरी साखरतर येथील कोरोना पॉझिटिव्ह महिला सध्या आयसीयूमध्ये
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना संशयित महिला रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे हे ही उपस्थित होते.सदरची महिला साखरतर अकबर मोहल्ला येथील राहणारी असून तीला निमोनिया याचा त्रास होता.त्यासाठी ती रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात आली होती. तेथील डॉक्टरांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते.त्यानंतर तिची टेस्ट करण्यास पाठवली असता पॉझिटिव्ह आली.तीला सध्या शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल आहे.तसेच तीच्या घरी १५ कुटुंबाचे सदस्य असून त्यांची शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात येत आहे.सदरच्या महिलेला कोरोनाचा संपर्क कसा झाला याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.याबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सध्या साखरतर गाव पूर्णपणे सील करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर साखरतर जवळ असलेली शिरगाव, बसणी,काळबादेवी या गावांचे प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.दरम्याने साखरतर येथे या महिलेच्या घराजवळ जमातीची मंडळी आली असुन ही जमातीची मंडळी १५ मार्चला मुंबई येथून आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.परंतू या महिलेचा या जमातीचा काही संबंध नसल्याची माहीती उघड झाली आहे व ती या जमातीच्या कोणत्याही माणसाचे संपर्कात नव्हती. यापूर्वीच या जमातीच्या लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.तसेच त्यांच्यामध्ये कोणतीही संशयास्पद लक्षणे अद्याप अाढळुन आलेली नाहीत. प्राथमिक तपासानुसार या जमातीचा दिल्लीशी काही संबंध नसल्याचे कळत आहे.दरम्याने ही महिला प्रथम ज्या रुग्णालयात उपचारासाठी गेली होती त्या रुग्णालयातील तिच्या संपर्कात आलेल्या कर्मचारी व अन्य रुग्णालयाच्या कर्मचार्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com