खासदार, आमदारांप्रमाणे जि.प व पंचायत समिती सदस्यांना देखील हवे निवृत्तीवेतन
देशभरातील खासदार आणि आमदारांना भरमसाठ वेतन आणि निवृत्तीवेतन दिले जाते. मात्र, आमदार व खासदारांप्रमाणेच ५ वर्षे जनतेची सेवा करणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्याना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद नाही. ते मिळण्यासाठी हे सदस्य आता एकवटले आहेत. निवृत्तीवेतनासह मुदतवाढ, मानधनवाढीसाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी राकेश शिंदे, महिला जिल्हा उपाध्यक्षपदी दीप्ती महाडीक, जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोद झगडे, महिला कार्याध्यक्षपदी दिशा दाभोळकर, चिपळूण तालुका महिला अध्यक्षपदी सभापती रीया कांबळे, उपाध्यक्षपदी धनश्री शिंदे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष उदय बने, रोहन बने आदी उपस्थित होते. www.konkantoday.com