मुंबईकरांनी सर्दी-ताप अंगावर न काढता तातडीने चाचणी करून खबरदारी घ्यावी, -पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल
मुंबईत 21 डिसेंबरपासून कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या दिशेने उच्चांकी रुग्णवाढ होत आहे. यामध्ये तब्बल 90 टक्के रुग्ण सर्वाधिक वेगाने प्रसार होणाऱया ओमायक्रोन व्हेरिएंटचे असून पुढील चार ते पाच दिवसांत हे प्रमाण 100 टक्के होण्याची शक्यता आहे.त्यामुळे दिवसाला 35 हजारपर्यंत रुग्णनोंद होऊ शकते. तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी पालिका सक्षम आणि तयार असली तरी मुंबईकरांनी सर्दी-ताप अंगावर न काढता तातडीने चाचणी करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले.
www.konkantoday.com