क्वायर बोर्डच्या माध्यमातून कोकणात उद्योग हाच प्रयत्न -ना. नारायण राणे
क्वायर बोर्डच्या बैठकीचा महाराष्ट्राला निश्चितच फायदा होणार आहे. काथ्या उद्योगातून कोकणातील तिन्ही जिल्ह्यात या माध्यमातून उद्योग कसे आणता येतील, यासंदर्भात आजच्या क्वायर बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी दिली. क्वायर बोर्डची २३९ वी बैठक हॉटेल निलम्स कन्ट्रीसाईड येथील सभागृहात ही बैठक पार पडली.
क्वायर बोर्डचे चेअरमन कुपुरामन दुरेपांडेय, बोर्डचे संचालक व्ही. व्ही. रामाण्णा (आंध्रप्रदेश) पी. एस. पाटील (गोवा, टी. के. अ. रविंदाक्षण पिल्लाई केरळ), एम. गोपाळराव (हैद्राबाद), पी. एस. राजेश (केरळ), एस. मोहन केरळ व्ही. एस. भुषणरेड्डी (आंध्रप्रदेश), एस. टी. कृष्णमूर्ती (कर्नाटक), बी. आर. जरना कर्नाटक जोगी गावडा (कर्नाटक) श्रीमती शुभी शोभू (केरळ), क्वायर बोर्डचे सेक्रेटरी एम. कुमार राजा या बैठकीला उपस्थित होते. या क्वायर बोर्डच्या बैठकीत कोकणात काथ्या उद्योगाच्या माध्यमातून उद्योग उभारणीची चर्चा झाली. यावेळी केंद्रातील वरिष्ठ अधिकारी झोनल संचालक जे. के. शुक्ला, संचालक (प्रभारी) एम. कृष्णा, सिनिअर अकौंट ऑफिसर व्ही. सी. रघुनंदन, सेक्शन ऑफिसर्स श्रीमती सी. एम. शामल, सेल्स ऑफिसर आर. एम. सलीम, पी. एस. सी. बी. आदी उपस्थित होते. www.konkantoday.com