महाराष्ट्रात काल नव्याने ३ हजार ९०० नव्या करोना रूग्णांची नोंद
महाराष्ट्रात काल (२९ डिसेंबर) नव्याने ३ हजार ९०० नव्या करोना रूग्णांची नोंद झालीय. विशेष म्हणजे यात एकट्या मुंबईत २ हजार ५१० रूग्ण आढळले आहेत.महाराष्ट्र आणि मुंबई दोन्हींमध्येही मंगळवारच्या (२८ डिसेंबर) तुलनेत मोठी वाढ झाली आहे. २८ डिसेंबरला महाराष्ट्रात २ हजार १७२, तर मुंबईत १ हजार ३३३ रूग्ण आढळले होते. याशिवाय मुंबईत एका करोना मृत्यूचीही नोंद झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांची काळजी वाढली आहे.
www.konkantoday.com