भांडण सोडविणे पडले महागात ,भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बोटी मालकालाच मारहाण

हर्णै बंदरातील सप्तश्रृंगी या मासेमारी बोटीवर काम करणार्‍या परराज्यातील खलाशी आपापसात मारामारी करत असताना ते सोडविण्यासाठी गेलेल्या बोटीच्या मालकालाच शिवीगाळ करून बोटीवरील साहित्य घेवून त्यांनी पळ काढल्याची तक्रार सुरेश चोगले यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली.
सुरेश नारायण चोगले यांची सप्तश्रृंगी ही मासेमारी बोट आहे. या बोटीवर अमरकुमार राजभर, राबविलाच राजभर, सुरज राजभर, मनोज राजभर, रा. सोंदाडी, रामगड (झारखंड) हे खलाशी म्हणून काम करत होते. २१ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वा. सुमारास हर्णै येथील जेटीवर हे खलाशी दारू पिवून मारामारी करत असताना बोटीचे मालक सुरेश चोगले व त्यांचा भाऊ हेमंत हे मारामारी सोडविण्यासाठी गेले. अमरकुमार राजभर हा सुरी घेवून सुरेश चोगले यांच्या अंगावर धावून आला. चारही खलाशांन सुरेश चोगले यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. खलाशांना सोडविताना झालेल्या झटापटीत हेमंत चोगले यांच्या उजव्या हातच्या अंगठ्याला दुखापत झाली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button