महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या सचिवपदी मंदार सावंत यांची निवड
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सदस्य मंदार सावंत यांची महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या सचिवपदी मुंबई येथे झालेल्या व्हॉलीबॉल संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नुकतीच निवड झाली.
मंदार सावंत हे गेली 22 वर्ष रत्नागिरीतील नामांकित शाळा फाटक हायस्कुल मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी अनेक नामवंत व्हॉलीबॉल खेळाडू घडवलेले आहेत. तसेच त्यांना शासनाचा जिल्हा गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. अशा रत्नागिरीतील नामवंत व्हॉलीबॉल खेळाडूला मुंबई झोनल सचिव पदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व खेळाडू व क्रीडाप्रेमी आनंदी झाले आहेत. मंदार सावंत यांचे प्रेरणास्थान जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन उपाध्यक्ष रविकिरण रेडीज हे आहेत
सचिव पदी निवड झाल्याबद्दल शासकीय अध्यापक महाविद्यालय व माजी विद्यार्थी मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रमा भोसले,माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव गणपती एडवी, विनायक हातखंबकर, सुभाष पाटील,श्री. गावडे आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com