अल्पवयीन मुलींशी सहा महिने शारीरिक संबंध ठेवून लग्न केले , आरोपीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
राजापूर येथे अल्पवयीन मुलीशी ६ महिने शारीरिक संबंध ठेवत तीला गर्भवती करुन ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्याशी लग्न केले.याप्रकरणीआरोपीला (पोक्सो) विशेष न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
प्रशांत मारुती गुरव (27, रा.राजापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आरोपीचे वडील मारुती गुरव (51) आई मनिषा गुरव (47, दोन्ही रा.राजापूर) आणि पिडीतेचे आई-वडिल या चौघांनी त्या दोघांचे लग्न लावून दिल्याचे साबीत न झाल्याने न्यायालयने त्यांची मुक्तता केली. ही घटना ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत घडली आहे. प्रशांतची पिडीतेशी ओळख होती. याचा गैरफायदा घेत त्याने ६ महिने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन तिला गर्भवती केले. ही बाब आरोपी प्रशांत व पिडीतेच्या आई वडिलांना समजताच त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार न देता दोघांचे लग्न लावून दिले.
www.konkantoday.com