पद्मश्री डॉ. घरडा यांनी यावर्षी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणार्या १३५ विद्यार्थ्यांचे पुढील चार वर्षासाठी पालकत्व घेतले
चिपळूण तालुक्यातील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रथम प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक आर्थिक व्यवहार ठप्प झाले असल्याने तसेच उदभवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रात विविध माध्यमातून उपक्रमशील राहिलेल्या पद्मश्री डॉ. घरडा यांनी यावर्षी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणार्या १३५ विद्यार्थ्यांचे पुढील चार वर्षासाठी पालकत्व घेण्याचे निश्चित केले आहे.
www.konkantoday.com