
नैसर्गिक संकटांमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱयांसाठी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांना वाऱयावर सोडणार नाही. त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. बळीराजाच्या पाठीशी अखंडपणे उभे राहू असे ठाम आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.त्याची पूर्ती त्यांनी केली. नैसर्गिक संकटांमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱयांसाठी एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. यामुळे राज्यातील हजारो शेतकरी आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.
www.konkantoday.com