
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव – जाकादेवी बाजारपेठेत युवकाची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव – जाकादेवी बाजारपेठेत १९ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीला आला. दीपक अनंत रहाटे असे त्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक अनंत रहाटे याच्या वडिलांचे तीन महिन्यापूर्वीच निधन झाले. ताे आणि त्यांच्या दाेन आईंसाेबत घरात चांगल्याप्रकारे राहत होते. नेहमीप्रमाणे दीपकने शुक्रवारी रात्री जेवण केले. जेवण केल्यानंतर तो आपल्या खाेलीत झोपायला गेला. सकाळी त्याची आई खाेलीत गेली असता दीपकने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले.
www.konkantoday.com