
उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर,ठरावाच्या बाजूने १६९मते,मनसेसह चार जण तटस्थ भाजपचा सभात्याग
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नव्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव मंजुर झाला.१६९ आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले तर मनसेसह चार आमदार तटस्थ राहिले व भाजपचे सर्व सदस्यांनी बहिष्कार टाकला.काँग्रेसच्या वतीने अशोकराव चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला सुनील प्रभू यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले नवाब मलिक व जयंत पाटील यांनी देखील प्रस्तावाला अनुमोदन दिले त्यानंतर प्रभारी अध्यक्ष दिलीप दिलीप वळसे पाटील यांनी हा विश्वासदर्शक ठराव प्रस्ताव आवाजी मतदानासाठी सभागृहात
ठेवला परंतु भाजपच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहातील कामकाज नियमबाह्य असल्याचे मांडले होते परंतु अध्यक्षांनी हे कामकाज योग्य रीतीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे चालत असल्याचे सांगितले त्यानंतर भाजप सदस्यांनी सभात्याग केला अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर सर्व सदस्यांनी उभे राहून आपली नावे जाहीर केलेव मतदान केले त्यानंतर मोजणी करण्यात आली.
सभागृहातील कामकाज नियमबाह्य पद्धतीने रेटून नेले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला मुळात हे अधिवेशन व मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी घेतलेली शपथही अयोग्य असल्याचे सांगितले. या ठिकाणी संविधानाची पायमल्ली होत आहे. असा आरोप फडणवीस यांनी केला म्हणून भाजपने सभात्यागाचा पवित्रा घेतल्याचे त्याने सांगितले.या सभागृहातील कामकाजाला मंजुरी मिळु नये असे पत्र राज्यपालांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .
www.konkantoday.com