आता नाट्यगृह उघडणार…. तिसरी घंटा पुन्हा वाजणार..!

आज दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री श्री. उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्यासाठी भेट घेतली. या चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष: नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते: मंगेश कदम मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघ अध्यक्ष: संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटना अध्यक्ष: किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी:
रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे, आणि ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणारे श्री. आदेश बांदेकर , श्री. सुबोध भावे. या सगळ्यांच्या उपस्थितीत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो असा की नाट्यगृह ५०% प्रेक्षक उपस्थितीमध्ये ५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button