तात्काळ नव्याने निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू न करण्याचा राज्य सरकारचा सुतोवाच
सणासुदीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी कठोर निर्बंध किं वा रात्रीची संचारबंदी लागू करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली असली तरी राज्याने आणखी प्रतीक्षा करण्याचे संकेत दिले आहेत.तात्काळ नव्याने निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू न करण्याचे सूतोवाच राज्य सरकारने केले आहे. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या पाश्र्वाभूमीवर लसीकरणावर भर देण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली.
राज्यात सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पूर्वार्धात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. तसेच पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबवलेल्या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेच्या धर्तीवर राज्यात आपापल्या भागांत लसीकरण मोहीम राबवण्याची सूचना ठाकरे यांनी केली आहे
www.konkantoday.com