सात गुन्हे दाखल करा की सत्तर की सत्तर हजार, मला काहीच फरक पडत नाही-केंद्रीय मंत्री नारायण राणे
यापूर्वी सभा, बैठका झाल्या नाहीत काय, हे मला माहित नाही का, मग आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का केली, सात गुन्हे दाखल करा की सत्तर की सत्तर हजार, मला काहीच फरक पडत नाही,असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.मुंबईत गुरुवारी विविध ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेत मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते सामील झाले होते. याप्रकरणी सात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याबद्दल राणे यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले.
www.konkantoday.com