देशातील दुसर्या डोसपासून ३.८६ कोटी लोक अजुन वंचित
देशभर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत असताना लसीकरणाला मात्र पुरेसा वेग येताना दिसत नाही. अनेक ठिकाणांवर लशींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही पुन्हा संसर्ग झाल्याचा प्रकार उघड झाल्याने यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील ३.८६ कोटी लोकांनी निर्धारित वेळेमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द केंद्र सरकारनेच दिली आहे. आरटीआय अंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. www.konkantoday.com