महापुरानंतर चिपळुणात कचऱ्याची मोठी समस्या, आरोग्याला धोका
चिपळुणातील महापुरानंतर आता नागरिकांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. महापुरानंतर शहरात साथीचे आजार बळावले आहेत. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी तातडीने आरोग्य तपासणी करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चिपळूणमध्ये पूर ओसरून आता तीन आठवडे होत आले तरीही संपूर्ण शहरात काही ठिकाणी अजूनही कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. विमा कंपन्याचे प्रतिनिधी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी येत असल्याने त्यांना हा कचरा दाखवण्यासाठी दुकानाच्या बाहेर ठेवला जात आहे. शिवाय शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे. अनेकांच्या घरातील चिखलगाळ काढण्याचे काम पूर्ण झाले मात्र, घरातील भिजलेल्या वस्तू आणि गाळ नागरिकांना रस्त्यावर टाकावा लागत आहे. हा गाळ तसाच रस्त्यावर पडून आहे.
www.konkantoday.com