खेड तालुक्यातील कोंडीवली येथील महिलेची कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात ४० लाख रूपयेची लॉटरी लागली असल्याचे सांगून पावणे नऊ लाखांची फसवणूक

खेड तालुक्यातील कोंडीवली येथील महिलेची कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात ४० लाख रूपयेची लॉटरी लागली असल्याचे सांगून पावणे नऊ लाखांची फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे
खेड तालुक्यातील कोंडीवली येथील महिलेला तुम्ही कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात ४० लाख रूपये जिंकले आहे. त्यापोटी मला टॅक्सीच्या मोबदल्यात ८ लाख ७६ हजार ५०० रू.भरावे लागतील असा फोन करून वरील रक्कम लाटून फसवणुक केल्या प्रकरणी आकाश वर्मा नामक व्यक्ती वर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही घटना दि १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मुदतीत घडली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे करीत आहेत. या प्रकरणी सईद जमालऊद्दीन कामाला रा कोंडीवली. ता खेड यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना कोंडीवली गावात घडली.
फिर्यादी यांना कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात ४० लाख रूपयाची लाॅटरी लागली आहे. या मोबदल्यात ८ लाख ७६ हजार ७५० रू. टॅक्सची भरणा करावी. लागेल.असे त्यांच्या मोबाईलवर सांगून. त्याच्याकडून त्यांचा इस्लामी बॅक दुबईच्या बँकेच्या चेकचा, आधाररकाडचा व अन्य कागदपत्र्याचे फोटो घेऊन फसवणूक केली असल्याचे तक्रारी त नमूद करण्यात आले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला पोलिसांनी ऑनलाईन फसवणूकी पासून सावधान राहण्याचा अनेकदा इशारा देऊनदेखील ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button