
देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये कोरोनाकाळात संयमाने राज्याचा गाडा हाकणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश
. ‘इंडिया टुडे’ने नुकत्याच केलेल्या सर्व्हेत लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही. विशेष म्हणजे देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये कोरोनाकाळात संयमाने राज्याचा गाडा हाकणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे.
‘इंडिया टुडे’च्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्व्हेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय 11 मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत पहिल्या स्थानावर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहेकेरळचे मुख्यमंत्री पिनराईन विजयन तिसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले आहे. योगींना या सर्व्हेत केवळ 29 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे.
www.konkantodat.com