
विनती कंपनीच्या व्यवस्थापकास धक्काबुक्की,युवासेनेच्या १५ जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक लिमिटेड या कारखान्याचे व्यवस्थापन, संरक्षारक्षक आणि युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा या मुद्यावरून शनिवारी दुपारी युवासेनेच्या १५ जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामध्ये भूमिपुत्र बेरोजगार तरूणांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी या मागणीसाठी युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते विनती ऑरगॅनिक या कारखान्याच्या व्यवस्थापनास भेटावयास गेले असता सुरूवातीला कारखान्याच्या व्यवस्थापनाने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना भेटण्यासाठी टाळाटाळ केली, असा आरोप युवा सेनेच्या पदाधिकार्यांकडून करण्यात आला. यानंतर युवा सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले व कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जमा होवून प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला असता कारखान्याचे सुरक्षारक्षक व कर्मचारी आतून प्रवेशद्वाराजवळ आले. स्थानिकांना नोकरीत घ्यावे याच्यावरील युवासेनेने आग्रह धरला होता त्यातून बाचाबाची झाली याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकाने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती www.konkantoday.com