रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय दुसऱ्या नव्या इमारतीलाही आता लिफ्ट सुविधा सुरू करण्यात येणार ratnagiri district collector office new building
खुद्द जिल्हा प्रशासनाच्या नव्या इमारतीला लिफ्टची तरतूद न करणाऱ्या बांधकाम खात्याचा कारभार कसा चालतो हे वेळोवेळी उघड झाले आहे त्यामुळे गैरसोय होत असलेल्या रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय दुसऱ्या नव्या इमारतीलाही आता लिफ्ट सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्याचे काम सध्या सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच या इमारतीत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. त्याचबरोबर या इमारतीवर आणखी एक मजला उठविण्यात येत असून, अन्य कार्यालयांनाही यात जागा मिळणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ए आणि बी या दोन प्रशासकीय इमारतींचे बांधकाम २०१२ साली पूर्ण होऊनही अनेक तांत्रिक अडचणींमुळे दोन्हीही इमारतींचे उद्घाटन सुमारे दीड वर्षे रखडले होते. या दोन्ही बिल्डिंगपैकी प्रत्येक मजल्यावर चार ब्लॉक आहेत. ‘ए’ बिल्डिंगमध्ये एकूण १२ ब्लॉकमध्ये १६ कार्यालये, तर ‘बी’ इमारतीत १२ ब्लॉकमध्ये १५ कार्यालये आहेत.
मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग अंदाजपत्रक तयार करताना त्यात वीज आणि पाणीपुरवठा या दोन मुख्य गोष्टीच नमूद करायला विसरले. एवढेच नव्हे तर ‘बी’ इमारतीत जिल्हाधिकारी यांचा कक्ष आणि केबिन असूनही या दुमजली इमारतीला लिफ्टची सुविधाही ठेवण्यात आली नव्हती. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आपल्या स्तरावर प्रयत्न केल्याने आता या दोन्ही इमारतींमध्ये विजेचा आणि पाणी पुरवठ्याची सोय झाली आहे. त्यानंतर आलेले प्रदीप पी. यांच्या प्रयत्नाने लिफ्टचा प्रश्न मार्गी लागला आणि या नव्या इमारतीची मोडतोड करून अखेर लिफ्ट सुरू करण्यात आली.
परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या नव्या इमारतीला (ए) मात्र, अजूनही लिफ्ट सुविधा नव्हती त्याचे काम आता सुरू झाले आहे
www.konkantoday.com