शेतमालाची विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी सहकार विकास महामंडळामार्फत राज्यात दोनशे कॉपशॉप उभारणार maharashtra copshops

शेतमालाची विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी सहकार विकास महामंडळामार्फत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी दोनशे कॉपशॉप (सहकार दुकान) उभारण्यात येणार आहेत. कॉपशॉपच्या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ मिळण्यासोबत ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार शेतमाल उपलब्ध होणार आहे.
सहकार विकास महामंडळांतर्गत राज्यात सुमारे दोन लाख नोंदणीकृत संस्था आहेत. त्यामध्ये गृहनिर्माण संस्था, अर्बन बँकां, पतसंस्था, शेतकरी उत्पादक कंपनी आणि महिला बचत गटांचा समावेश आहे. कॉपशॉप सुरू करण्यासाठी किमान दोनशे चौरस फुटापर्यंत जागा असणे आवश्यक आहे. माल ठेवण्यासाठी मांडणी, संगणक, प्रिंटर अशी साधने स्वखर्चाने आणावी लागतील. त्यासाठी सुमारे एक लाख रुपये गुंतवणूक कंपनीला करावी लागणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button