कृषी आयुक्तालय स्तरावर स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना करण्याचा निर्णय
राज्यात कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाचे मुख्यालय पुण्यातील कृषी आयुक्तालयात राहील.
केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडित योजना संचालनालयामार्फत राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, स्मार्ट प्रकल्प, पोकरा प्रकल्प, गट शेती, छोट्या व्यापाऱ्यांचा कृषी व्यापार संघ, जैविक शेती मिशन, कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, सार्वजनिक व खासगी भागीदारीद्वारे एकात्मिक कृषी विकासासाठी प्रकल्प, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क, प्रधानमंत्री किसान संपदा योजना यासह इतर प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com