जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतात वापराला मंजुरी
कोरोना विरोधातील लढ्यात भारताला आणखी बळ मिळणार आहे. कारण, भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही लस भारतीयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जॉन्सन अँड जॉन्स कंपनीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारताकडे मंजुरी मागितली होती. भारताने त्याला हिंरवा कंदील दाखवला आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.
www.konkantoday.com