अन्यथा खासगी नोकरदारांचे ईएमआय बंद करा आणि दरमहा १५ हजार रुपये भत्ता द्या, वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असल्यानं राज्य सरकारनं मुंबईमध्ये कोरोना निर्बंधांत काहीशी सूट दिली आहे. त्याप्रमाणे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याची मागणी सातत्यानं केली जात आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळात लोकल प्रवास बंदी असल्यानं खासगी कंपनीतील नोकरदार वर्गाला मोठा फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर, आता ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांना कार्यालयाच्या ठिकाणी पोहचणे कठीण झालंय. त्यामुळे सरकार, प्रशासनाने लोकल सुरू करणं अपेक्षित आहे. अन्यथा खासगी नोकरदारांचे ईएमआय बंद करा आणि दरमहा १५ हजार रुपये भत्ता द्या, अशी मागणी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेनं केली आहे
www.konkantoday.com