देवरूखातील रस्ते गणपतीपूर्वी दुरूस्त करा devrukh roads
देवरूख शहरातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील वाढती वाहतूक काही व्यापार्यांचे फलक, दुकानांवरील पत्रे, अस्ताव्यस्त पार्किंग तसेच अनधिकृतपणे लावलेल्या टपर्या यामुळे ग्राहक तसेच ज्येष्ठ नागरिक यांना येणे-जाणे कठीण झालेले आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील रस्त्यावरील जागोजागी पडलेले खड्डे आहेत, त्याची डागडुजी करण्याबाबत समविचारी मंच प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे.
Demand for repair of roads in devrukh before ganpati festival
गणेशोत्सवाच्या पूर्वी स्थानिक प्रशासन, तहसीलदार, पोलीस ठाणे यांनी पूर्वनियोजन करावे. याकरिता महाराष्ट्र राज्य समविचारी मंच रत्नागिरीचे संगमेश्वरच्यावतीने संबंधितविभागांना निवेदन देण्यात येणार आहे, असे मनोहर गुरव यांनी सांगितले.
www.konkantoday.com