
संगमेश्वरच्या फुणगूस खाडीपट्ट्यात शेकडो झाडांची राजरोस कत्तल.
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीपट्ट्यात बेसुमार वृक्षतोड सुरू असून, शेकडो झाडांची राजरोस कत्तल होत आहे. वन विभाग मात्र या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे.पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तसेच भविष्यात राज्याचे व्यवस्थापन करण्यााच्या दृष्टीने शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये वृक्षतोड बंदी, तसेच जंगले अबाधित ठेवून डोंगर, जमिनीची धूप थोपविणे अशा उपाययोजनांचा समावेश देखील करण्यात आला आहे. परंतु शासनाच्या नियमांना चक्क धाब्यावर बसवून जंगले उध्वस्त केली जात आहेत. तसाच प्रकार संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावात उघडपणे सुरू असल्याचे समोर आले आहे.www.konkantoday.com