२५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी सुरू
अतिवृष्टी व पुरामुळे चिपळूण शहर व परिसरातील वीजपुरवठा बंद पडला होता. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने पूरही ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. महावितरणची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत आहे. पुरामुळे ५० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प होता, मात्र २५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी सुरू करण्यात आला आहे.
www.konkantoday.com