हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे’,-मनसे नेते संदिप देशपांडे

पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री सोमवारी पंढरपूरकडे रवाना झाले होते. विषेश म्हणजे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले. त्यावर आता मनसेने खोचक टीका केली आहे.
‘हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे’, अशी खोचक टीका मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केली आहे.जशी विठ्ठलाची भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेऊ दे हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असल्याचंही त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button