राज्यातील सात जिल्ह्यांतील मच्छिमारांच्या डिझेल परताव्याचे २२२ कोटी थकित
राज्यातील सात जिल्ह्यांतील मच्छिमारांच्या डिझेल परताव्याची राज्य सरकारकडे २२२ कोटींहून अधिक रुपयांची रक्कम चार वर्षापासून थकीत आहे. यातच आता १ ऑगस्टपासून सुरू होणार्या मासेमारी हंगामाची लगबग सुरू होण्यापूर्वी परताव्याची रक्कम मिळणे गरजेचे आहे. अन्यथा थकीत परताव्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील मच्छिमारांच्या संस्थांना अधिक अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरच डिझेल परताव्याची रक्कम अदा करावी, अशी मागणी मच्छिमार संस्थांकडून केली जात आहे.
जिल्हानिहाय डिझेल थकीत परतावा
रायगड -४३ कोटी ४३ लाख ६१ हजार ९९, पालघर-८ कोटी ७८ लाख ५९ हजार ५६५, ठाणे-९ कोटी ७४ लाख ४६ हजार १०३, मुंबई उपनगर-५५ कोटी पाच लाख ६० हजार ९७६, मुंबई उपनगर- ५४ कोटी ३८ लाख १२ हजार ८२०, रत्नागिरी- ४७ कोटी ४३ लाख ६९ हजार १५८, सिंधुदुर्ग- ४ कोटी १९ लाख ३६ हजार १३७.
www.konkantoday.com