
कोमसापचे ६, ७ एप्रिलला मालगुंड येथे जिल्हा संमेलन उत्साहात साजरे होणार
_मराठी संवर्धन, मराठीचा जागर करण्याकरिता कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा मराठी साहित्य संमेलन येत्या शनिवारी ६ एप्रिल आणि ७ एप्रिल रोजी मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सााहित्यिका डॉ. अनुपमा उजगरे भुषवणार असून स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रविंद्र तथा अण्णा सामंत आहेत.लँडमार्क हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संमेलनाची माहिती केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर व संमेलन संयोजन समितीचे प्रमुग रमेश कीर यांनी दिली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा संमेलनाचे कोषाध्यक्ष आनंद शेलार, संमेलन कार्याध्यक्ष गजानन पाटील, प्रमुख कार्यवाह माधव अंकलगे, नलिनी खेर आदी उपस्थित होते.संमेलनात शनिवारी सकाळी ८.३० वा. ग्रंथदिंडी काढण्यात येईल. या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत उपस्थित राहणार आहेत. १० ते १२.३० या वेळेत उदघाटन कार्यक्रमाला संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रविंद्र तथा अण्णा सामंत, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, साहित्यिक सुरेश जोशी, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, अरूण नेरूरकर, केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी उपस्थित राहतील. www.konkantoday.com