नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?”-मनसेचे संदीप देशपांडे यांचा सवाल
आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे” अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. देशातील १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर वन ठरल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता.नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला
सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, वेठीस धरू नये. निर्बंध का उठवत नाही? असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला.
ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झालं तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? या सरकारने काय कामं केली? शाळेच्या फीचा प्रश्न आहे, व्यापारी नाराज आहेत, हे वसुली सरकार हफ्तेखाेरी करतंय.
दुकानं बंद, रेल्वे बंद, लोक घरात, वेठीस धरण्याचं काम होतंय, असंही संदीप देशपांडे म्हणाले.
www.konkantoday.com