अदानी समूहाने आता जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली
अदानी समूहाने आता जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली आहे. मंगळवारी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ही घोषणा केली. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती.
या करारानंतर अदानी ग्रुपचा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळात ७४ टक्के हिस्सा असेल. त्यापैकी ५०.५ टक्के भागभांडवल जीव्हीके समूहाकडून आणि उर्वरित २३.५टक्के भागभांडवल भागीदार विमानतळ कंपनी दक्षिण आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूहाकडून अधिग्रहित केला जाईल.
www.konkantoday.com