
रत्नागिरी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त व लेखा अधिकार्यांची पदे भरण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सध्या विविध अधिकारी तसेच कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. शेवटी त्याचा थोडाफार परिणाम कामकाजावर होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त व लेखा अधिकार्यांची पदे भरण्यासंदर्भात तत्काळ सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील बैठकीत दिल्या आहेत. हे करताना काकणात काम करण्यास उत्सुक असलेल्या अधिकार्यांची पसंती घेऊन प्राधान्याने नियुक्ती करावी असेही त्यांनी सूचित केले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शासनाच्या विविध विभागांची महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यानी यावेळी झालेल्या बैठकीत दिले.
कोकण विभागात विशेष सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काम करण्यास उत्सुक नसल्याने बहुतांश अधिकारी तिथून बदली करून घेतात. त्यामुळे कोकणातील पदे रिक्त होत आहेत.
www.konkantoday.com