बीडीएस परीक्षेत दामले विद्यालयाचा वरचष्मा

५८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले; तब्बल २८ जणांना सुवर्ण

रत्नागिरी, दि. : ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप या देश पातळीवरील शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या उज्ज्वल यशाची परांपरा कायम राखत सन २०२१ मध्ये तब्बल ५८ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे . यामध्ये २८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, २२ विद्यार्थ्यांना रौप्य; तर ८ विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावले आहे . कोरोना काळातही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदानाचा वसा जोपासणाऱ्या दामले विद्यालयाने स्पर्धा परीक्षांमध्ये प्राप्त केलेले हे यश कौतुकाचा विषय ठरत आहे .
या वर्षी प्रथमच बीडीएस परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. शाळा बंद पण शिक्षण सुरू या ब्रीद वाक्याची कास धरून शाळेच्या सर्वच मेहनती शिक्षकांनी या बाह्य स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून वर्षभर मार्गदर्शन वर्ग घेतले . त्याचेच रूपांतर पुढे या यशामध्ये परिवर्तित झाले, असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश जाधव यांनी यशाबद्दल बोलताना व्यक्त केले .
शाळेचा इयत्तानिहाय निकाल असा : इयत्तापहिली : सुवर्ण पदक १ ) अर्णव भोसले _१००, २ ) अनन्या मांजरेकर-९८, ३ ) दुर्वा नार्वेकर- ९८, ४ ) आराध्या गुळेकर-९६, ५ ) कुंदन पोयनाडकर-९७, ६) केयुरी नागवेकर-९७, ७) स्वरा पारदुले-९९, ८) आराध्या राजेश आयरे-९९, ९) श्रीराम पळसुळेदेसाई-९७, १०) सावनी सरपोतदार-९६, ११) परी साळवी-९९, १२) स्वरा कीर ९६, रौप्य पदक १ ) जिया तावडे -९५, २ ) ओजस्वी प्रसादे -९४, ३) दिनेश आखाडे-९४, ४) स्वरा शिवलकर-९२, ५) सात्विक नेवरेकर-९१, कांस्य पदक १ ) गुंजन कोकरे-८९ .
इयत्ता दुसरी : सुवर्ण पदक : १)श्रीशा कोतवडेकर – ९७, २)इरा उदय गोखले – ९७, ३)श्रेयश घडशी – ९७, ४)अर्णव तोडणकर-९७, ५)आराध्या कामतेकर . रौप्य पदक : १)वेदांत कोकरे – ९५, २)गौरांग लिंगायत – ९५, ३)आर्या वरक – ९४, ४)अक्षाली सांबरे – ९४, ५)रिध्देश कुळये – ९४, ६)जोयल म्हस्के – ९४, ७)सबुरी कांबळे- ९३, ८)सान्वी सडाके – ९२, ९)निहार खेडसकर- ९१, १०)उत्कर्षा माळी – ९१, कांस्य पदक : १) स्वराज्ञी सरपोतदार-८९, २)पूर्णीमा माने – ८६.
इयत्ता तिसरी : सुवर्ण पदक : १ ) आयुष पुरुषोत्तम कोकणी:- ९८, स्वरा योगेश कदम – ९८, ३ ) ईशा विशाल चव्हाण ९६, ४ ) आदिती मुकेश धुळप – ९६ . रौप्य पदक : १ ) जयेश हेमंत जोशी – ९४, २ ) मार्तंड नरेंद्र गावंड – ९३, ३ ) राज रमेश कोकरे – ९३, ४ ) युवराज मिलिंद कारकर – ९३, ५ ) श्लोक संदेश लिंगायत – ९२ . कांस्य पदक : १ ) ओम हरिश्चंद्र वरेकर – ८९, २) श्रेया सचिन खंदारे – ८४ .
इयत्ताचौथी : सुवर्ण पदक : १ ) आर्षती समीर कारेकर – ९७, २ ) धनश्री कुडकेकर – ९२, ३ ) अर्णव आशिष सरपोतदार – ८८, ४ ) श्रावस्ती यादव – ८७, ५ ) नेहा टोपकर – ८७ . रौप्य पदक : १ ) आयुष यादव – ८४, २ ) अत्रेय देवस्थळी – ८० . कांस्य पदक : १ ) अमोद जाधव – ७६, २ ) सिद्धेश पानकर – ७४ .
इयत्तासहावी : सुवर्ण पदक : १ ) श्रेया मुदगल – ९२, दत्तप्रसाद मुळ्ये – ९१ .
इयत्तासातवी : सुवर्ण पदक : सिद्धी गोडसे -९०, कांस्य पदक : ओमसाई गोरल – ७५ .
कोरोना महामारीच्या काळात ऑफ लाईन आणि ऑन लाईन शिक्षणाची योग्य सांगंड घालत दामले विद्यालयाच्या शिक्षकांनी केलेले यशस्वी मार्गदर्शन, त्याला पालक व विद्यार्थ्यांनी दिलेली समर्थ साथ हेच यशाचे गमक असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री . कुंडलिक कांबळे यांनी म्हटले आहे . शाळेने प्राप्त केलेल्या या सुवर्णमयी यशाचे प्रशासन अधिकारी श्री .सुनील पाटील यांनीही कौतुक केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button