संगमेश्वर ते जाकादेवी मार्गाचे विस्तारीकरण व राज्यमार्गाचा दर्जा देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची मंजुरी

रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर ते जाकादेवी मार्गाचे विस्तारीकरण व राज्यमार्गाचा दर्जा देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली असून त्याच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. यामुळे पर्यटक आणि भाविकांसाठी उपयुक्त ठरणाऱया या मार्गासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर ते जाकादेवी रस्त्याला महामार्गाचा दर्जा देऊन किमान दोन मार्गिकांचा रस्ता मंजूर करण्याची मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. या मार्गाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली. या कामाची निविदा निघाली असून कंत्रादारांला वर्क ऑर्डर देण्यात आली आहेत.संगमेश्वर ते गणपतीपुळे हा राज्यमार्ग पूर्ण झाल्यानंतर पनवेल-महाड-पणजी राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेकडून येणाऱया पर्यटकांना गणपतीपुळेला जाण्यासाठी जवळचा पडणार आहे. मुंबईवरून गणपतीपुळे येथे जाणारे पर्यटक सध्या महामार्गावरून निवळीमार्गे जातात. या मार्गाने संगमेश्वरपासून निवळीमार्गे गणपतीपुळे या अंतरापेक्षा व प्रस्तावित रस्त्यावरून संगमेश्वरपासून पोचरी फुणगूस डिंगणी जाकादेवी मार्गे गणपतीपुळे अंतर 16 किलोमीटरनी कमी होणार आहे.
हा रस्ता श्रीक्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखडा 2017-18 या योजनेतंर्गत मंजूर आहे. रस्त्याच्या कामासाठी 6 कोटी 9 लाख रुपये मंजूर आहेत. सध्या हा रस्ता 3.75 मीटर रुंद असून तो 15 मीटर रुंद केला जाणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर गणपतीपुळेला जाणाऱया पर्यटकांचे वेळ व अंतर कमी होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button