
राजापूरात शिवसेनेसह अन्य काही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार
राजापूर पक्षसंघटनात्मक बांधणी आणि एका पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे आज रविवारी, ४ जुलै रोजी राजापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत राजापूर शहरातील राजापूर हायस्कूल कलामंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. तशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिली आहे.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या विशेष प्रयत्नांतून शिवसेनेसह अन्य काही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन व भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com