
फिनोलेक्स ऍकॅडमीचा उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय पुरस्काराने सन्मान
झी न्यूज डॉट कॉम, इंडिया डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या झी डिजिटल एज्युफ्यूचर एक्सलंन्स सोहोळ्यात फिनोलेक्स ऍकॅडमीला पश्चिम विभागातील उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऍकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. आयोजकांच्यावतीने उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालये, शिक्षकांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने एज्युफ्यूचर एक्सलंन्स पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशातील अभियांत्रिकी व्यवस्थापन, मीडिया, डिझाईन उद्योगात भविष्यात घडविण्याकरिता शिक्षकांच्या अनुकरणीय योगदान मान्यता देण्याचे या पुरस्काराचे उद्दिष्ट होते. या पुरस्कारासाठी तज्ञ, सन्माननीय सदस्य, ऑनलाईन सर्वेक्षण एडुस्टार्ट सोल्युशन्स यांच्यामार्फत मुल्यांकन केले गेले. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी उदघाटन सोहोळ्याला आपले मनोगत व्यक्त केले.
www.konkantoday.com