
पर्यटकांचे वास्तव्य आढळल्यास लॉजिंग व्यावसायिकांवर कारवाई
श्रीक्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात येणारे पर्यटक, भाविकांची संख्या अचानकपणे वाढली आहे. हे सर्वजण भाड्याच्या खोल्या घेवून लॉजिंगमध्ये वास्तव्याला रहात असल्याचा गंभीर प्रकार जागृत ग्रामस्थांनी उघडकीस आणला आहे. यापुढे पर्यटक, भाविकांचे वास्तव्य असलेल्या लॉजिंग व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस यंत्रणेमार्फत देण्यात आला आहे.
काही ग्रामस्थांनी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडे या संदर्भात पुराव्यासह तक्रारी दाखल केल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने लॉजिंग व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने रितसर परवानगी दिलेली नाही.
www.konkantoday.com
