रत्नागिरी जिल्ह्यातील १० हजार ९९२ रिक्षा चालकांपैकी फक्त ३ हजार १९८ रिक्षाचालकांच्या प्रस्तावाला मंजूरी

केवळ ३१९८ रिक्षाचालकांना मिळणार १५०० रुपये
रत्नागिरी जिल्ह्यातील १० हजार ९९२ रिक्षा चालकांपैकी ३ हजार १९८ रिक्षाचालकांच्या प्रस्तावाला येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने मंजुरी दिली आहे. तर ८८० प्रकरणांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आहे. १७ प्रकरणे कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहेत. आरटीओ कार्यालयाकडे २७ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आलेल्या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. लवकरच रिक्षाचालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहेत असे आरटीओ सुबोध मेडसीकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button