
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी
राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ६ जिल्हा परिषदा आणि ४४ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी करणारी रिट याचिका राज्य सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे.
www.konkantoday.com