कोस्टगार्ड कर्मचार्याची लाखोंची ऑनलाइन फसवणूक
बीएसएनएल मोबाईलची केवायसी अपडेट करायची असल्याची बतावणी करत कुलविंदर सिंग सिद्दू या कोस्टगार्ड कर्मचार्याची १ लाख ६४ हजाराची ऑनलाइन फसवणूक करण्याचा प्रकार रत्नागिरीत घडला आहे
याबाबत कुलविंदर सिंग सिद्दू (५६,मूळ रा.पंजाब सध्या रा. कोस्टगार्ड विमानतळ एमआयडीसी, रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, शर्मा नावाच्या अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी सायंकाळी सिद्दू यांच्या मोबाईलवर फोन करून तुमच्या बीएसएनएल मोबाईलची केवायसी अपडेट करायची असल्याची बतावणी केली.त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सिद्दू यांनी त्याने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर सिद्दू यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख ६४ हजार ९९९ काढून फसवणूक केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव करत आहेत.
www.konkantoday.com