
नाणार रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द होऊ देणार नाही-खा. नारायण राणे
नाणार रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द होऊ देणार नाही. हा प्रकल्प कोकणच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने नाणार परिसरात होणे आवश्यक आहे. हा प्रकल्प उभा रहावा यासाठी रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील विविध संघटना या प्रकल्पाला समर्थन देण्यासाठीचे जे प्रयत्न करत आहेत त्या सर्व प्रयत्नानांना माझा पाठिंबा राहिल. मी आता दिल्लीला जात आहे. दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन त्यांच्याशी हा प्रकल्प नाणार परिसरात व्हावा यासाठी प्रयत्न करीन अशी ग्वाही भाजप नेते, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी रत्नागिरी येथील फेडरेशन आॅफ असोसिएशन फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंट (फार्ड) च्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी आ.नितेश राणे ही उपस्थित होते.
www.konkantoday.com