मिरजोळे येथील वाडकरवाडी खालचा पाट परिसरातील शेतजमीन अतिवृष्टीमुळे खचली

दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी परिसरात मुसळधार पाऊस कोसळला रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथील मधलीवाडी वाडकरवाडी खालचा पाट परिसरातील शेतजमीन अतिवृष्टीमुळे खचली आहे. गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे १५ ते २० फूट खोल शेतजमीन खचली आहे. शेतजमीन खचल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेली अनेक वर्षे मिरजोळे येथे शेतजमीन खचण्याच्या घटना घडत आहेत.
मिरजोळे परिसरातील शेतजमीन थोड्या थोड्या प्रमाणात खचत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. २००६मध्ये प्रथम या भागात जमीन खचली होती. त्यानंतर दरवर्षी पावसाळ्यात या परिसरात जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत. गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जमीन खचली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button